एक छोटी कथा श्री गणेशांची

 श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः

आज दि. ०३/०९/२०२३ रविवार . आज संकष्ट चतुर्थी गणरायाचा दिवस आजचा दिवस

सर्वांना आनंदाचा आणि समाधानाचा जावो हीच श्री गणेश चरणी प्रार्थना .

चंद्रोदय ०९.२३ 

तिथी: कृ. चतुर्थी.१८.२४

नक्षत्र: रेवती.१०.३७

योग: वृद्धि.२७.१०

करण:बव

      आज आपण गणरायाची एक छोटी कथा बघूया.

             एक दिवस विग्नहर्ता श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांचे वाहन उंदीर आणि मोर यांच्यामध्ये वाद होतो की सर्वात जास्त गतीने कोण धावू शकतो. मग तिथे श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय येतात अन त्याचा देखील हाच विषय चालू असतो त्याचा निर्णय करण्यासाठी सर्व जण देवाधी देव महादेव अन माता पार्वती यांच्या कडे जातात झालेला सर्व प्रकार महादेव अन माता पार्वती याना सांगतात मग तिथे देवर्षी नारायण यांचे आगमन होते अन मग ते याचा निर्णय करण्यासाठी श्री गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्या मध्ये एक स्पर्धा लावता.

       स्पर्धा अशी की जो कोणी पूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा पूर्ण करेल तो विजयी होणार. अन मग श्री गणेश अन भगवान कार्तिकेय यांची स्पर्धा सुरू होते स्पर्धा सुरू होताच भगवान कार्तिकेय त्याचा वाहन मोर यावर स्वार होऊन खूप गतीने ब्रम्हांडाची परिक्रमा करायची सुरवात करतात परंतु श्री गणेश हे रिद्धी-सिद्धी आणि बुद्धी चे प्रतीक आहेत ते कुठेही न जाता आपले माता-पिता म्हणजेच देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांची परिक्रमा करतात देवर्षी नारदमुनी याना संभ्रमात पडतात अन बाळ गणेश यांना विचारतात की आपण कुठेही गेले नाही अन लवकर गेले नाही तर तुम्ही ही स्पर्धा हरणार.परंतु श्री गणेश यांनी सांगितले की माता-पिता के चारणो संपुर्ण ब्रम्हांड सामावला आहे मग कुठे जयायची गरज नाही म्हणून माता पिता ची परिक्रमा करून मी पूर्ण ब्रम्हांडाची परिक्रमा पूर्ण केली.

अशा प्रकारे या कथे मधून असा बोध मिळतो की आपण कुठेही गेलो किंवा काही केलं तरी माता-पिता ची सेवा त्यांचा आदर त्यांची काळजी अन प्रेम दिलं तर आपण पूर्ण ब्रम्हांड जिंकू शकतो जग जिंकू शकतो 

श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः



Comments

Popular posts from this blog

प्रेम प्रेम म्हणजे काय ?