प्रेम प्रेम म्हणजे काय ?
प्रेम म्हणजे काय ?
प्रेम कोणावर करावं?
प्रेम किती करावं?
प्रेम कस करावं?
प्रेम किती कोणावर करावं?
या जगात जेव्हा आपलं जन्म होतो तेव्हा पासून आपल्याला पहिला प्रेम मिळतो तो आपल्या आईचा अन वडिलांचा त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल प्रेम हे आई-वाडीलांचा असत. म्हणून आपणही त्याच भावनेने त्यांच्यावर प्रेम केल पाहिजे (कधीही न संपणार निस्वार्थी प्रेम)
आपण या जगात आल्यावर आपल दुसर प्रेम म्हणजे आपले नातेवाईक आजी-आजोबा,काका काकी,मामी-मामी,मावशी असे त्यांचं प्रेम हे प्रेम प्रत्येक नात्या नुसार कमी जास्त असतो
( क्षणिक असणार प्रेम )
जेव्हा आपल्याला या जगातील सर्व काही समजायला लागत अन अचानक एखादी अनोळखी वेक्ती बद्दल ओढ निर्माण होते ती वेक्ती आपल्याला आवडायला लागते ती वेक्ती आयुष्यात असली तर आपलं आयुष्य खूप चांगलं होईल अस वाटत.
ती अशी वेक्ती असते जी आपल्या रक्ताची नसते किंवा नात्याची नसते पण त्या वेक्ती सोबत अस काही नातं बनत की त्या वेक्ती शिवाय आपलं आयुष्य खाली खाली वाटत. ती अशी एकमेव वेक्ती आहे ज्यावर आपण सगळ्या नात्याने प्रेम करू शकतो मग हे प्रेम ( निस्वार्थ ही असते अन क्षणिक सुद्धा असू शकते )
प्रेम किती करावं?
कोणावर किती प्रेम कराव यावर मर्यादा नाही आपण प्रेम करतो ते कोणावर करतो यावर प्रेम किती करावं हे अवलंबून असते आई-वडील याच्यावर प्रेम करायला मर्यादेची गरज नसते ते कधीही न संपणार प्रेम असत पण कोणाच्या सांगण्यावरून आई-वडिलांना दुःख द्यायला सुरुवात होते तेव्हा तिथे प्रेम संपून जाते काही लोक गरजे पुरता प्रेम करतात त्यांची गरज पूर्ण झाली की ते समोरच्याला विसरून जातात. पण जो मना पासून प्रेम करतो त्याला खूप त्रास होतो हे ती वेक्ती विसरून जाते. या जगात दोन अश्या वेक्ती आहेत की ज्या निस्वार्थ भावनेने प्रेम करतात कितीही कठीण परिस्थितीत आपली साथ सोडत नाही आणि ते म्हणजे आपले आई-वडील. म्हणून प्रेम कराव ते फक्त आई वडिलांवर करावं.
प्रेम कस कराव?
प्रेम कस करावं तर प्रेम निस्वार्थ करावं.
आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या वर आपण देखील तसच प्रेम दिलं पाहिजे या जगात कोणी कोणाचं नसत अस सांगतात पण या जगात आई-वडील सोडून एक तरी अशी वेक्ती असते जी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करते.
Comments
Post a Comment